Mid Michigan Marathi Mandal (M4)
मिड मिशिगन मराठी मंडळ
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला अभंग आठवतो आहे? मोगरा फुलला. मोगरा फुलला इवलेसे रोप लावियले दारी तयाचाही वेलू गेला गगनावेरी.
आपण वसंतोत्सव साजरा केला तेव्हा M4 मराठी मंडळ स्थापन करून असच एक छोटस रोप लावलं. आता त्याला खत पाणी देऊन तो वेल वाढवायचा आहे. त्याला इतका भक्कम आधार देऊ या कि हा वेल पण गगनावर जाईल.
ह्या मंडळाचा उद्देश? उद्देश एव्हडाच, जवळपासच्या सार्या मराठी मंडळीनी एकत्र येऊन आपला मराठी बाणा अमेरिकेत जपायचा. ह्या मंडळामुळे आपल्याला उत्तर अमेरिकेच्या BMM बरोबर सलग्न होता येईल. आपली मराठी शाळा जोरात सुरु आहेच, तिलाही इतर प्रदेशातल्या शाळांकडून सहकार्य मिळेल.
आपली सदस्य संख्या वाढली की, आपल्याला आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची कक्षा वाढवता येईल. इतर मंडळांबरोबर सहकार्य करून काही त्यांचे कार्यक्रम, भारतातील कार्यक्रम इथे पाहता येतील.
आम्हाला खात्री आहे कि हे रोपट जस वाढू लागेल तस आपल्यातील कित्येकांच्या कल्पनांना पंख फुटतील आणि त्या एकत्र करून आपण काहीतरी भरीव कामगिरी करू शकू.
तर मग होणार का सभासद?
- शुल्क आहे, कुटुंबासाठी वार्षिक $५०,
- विद्यार्थ्यांसाठी वार्षिक $१०